Mumbai: मेघवाडी येथील पोलिसांनी देशी बंदुकांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आरोपींकडून देशी बंदुकांसह अन्य हत्यारे सुद्धा जप्त करण्यात आली आहेत.
जोगेश्वरी पूर्व येथे दोन अज्ञात व्यक्ती देशी बंदुकांसह अन्य हत्यारांची तस्करी करुन ते विकण्यासाठी आणल्याची माहिती मेघवाडी पोलिसांनी त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच राजू तिवारी आणि जगदीश जाधव अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोन आरोपींनी उत्तर प्रदेशातून या हत्यारांची तस्करी केली असल्याचे उघडकीस आले आहे. तर दोन देशी बंदूकांसह आठ जिवंत काडतूसेही या आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तसेच न्यायालयाने या आरोपींवर करडी नरज ठेवण्यास सांगितले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडू नये म्हणून मेघवाडी येथील पोलीस वारंवार या प्रकारच्या आरोपींवर कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.