Mumbai Bike Stunt (Image Credit PotholeWarriors - Twitter)

काही दिवसापुर्वी मुंबईतील एका बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होता. त्याच्या पुढे एक तरुणी आणि मागे दुसरी तरुणी देखील बसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील संतप्त प्रतिक्रीया दिल्या होत्या आणि त्यांना अटक करण्याची मागणी देखील केली होती. यानंतर वांद्रे कुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून फैयाज कादरी असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या सोबतच्या दोन तरुणींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.  (Mumbai Bike Stunt: मुंबईतील युवकांचा दोन तरुणींसोबत बाईकवर स्टंट, पोलिसांत गुन्हा दाखल)

मुंबई पोलिसांनी या बाईकस्वाराला आणि त्या दोन तरुणींना अटक केली असून धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. वांद्रे कुर्ला संकुल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने गाडी चालवून स्वत:चा आणि इतरांचा प्राण संकटात आणू नये अशी भूमिका या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी घेतलेली दिसून आली.