मुंबई: नोकरी देणार सांगून लाखोंचा गंडा घालणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, एका महिलेचा समावेश
Mumbai Police Arrested Fraud Team (Photo Credits: Twitter)

अनेकदा सोशल मीडिया, कॉल सेंटर या माध्यमातून लोकांना फसवले जात असताना सुद्धा अद्याप सायबर क्राईम्सच्या बाबतीत जागरूकता दिसून येत नाहीये. ही बाब लक्षात घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सर्वसामन्यांना लुबाडतात. असाच काहीसा प्रसंग माटुंगा (Matunga) येथील रहिवाशी योगेश राठोड (Yogesh Rathod)  यांच्या बाबतीतही घडला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या योगेश यांना कॉल सेंटर मधून "तुमची एअर लाईन कंपनीमध्ये तिकीट अधिकारी म्हणून निवड होऊ शकते असा कॉल आला मात्र त्याआधी मुलखात, विमा आणि अन्य खर्चांसाठी तुम्हाला 1.50 लाखांचे डिपॉझिट द्यावे लागेल असे देखील या महिलेने सांगितले. योगेश यांनी सांगितल्यानुसार ही रक्कम बँक खात्यात जमा केली, मात्र त्यानंतर या कॉल सेंटरचा नंबरच बंद झाला. या प्रकरणाने गांगरून गेलेल्या योगेशने पोलिसांकडे तक्रार केली, आणि शनिवारी पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी मागील कित्येक दिवसांपासून अशाच प्रकारे देशभरात लोकांना लुबाडत आहे. या साठी मॉडस ऑपरेंडी पद्धतीचा वापर करण्यात आला होता, बँकांच्या व्यवहार तपासल्यावर हा खुलासा झाला आहे. योगेश यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शनिवारी 23 वर्षीय महिला आरोपीला ताब्यात घेतली होते. यावेळी महिलेने आपण नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांची माहिती मिळवून त्यांना खोटे आश्वासन देत पैसे उकळत असल्याचे कबुली दिली. यासाठी त्यांची टोळी नोएडा येथून एक बनावट कॉल सेंटर सुद्धा चालवत होते . हे माहिती मिळताच पोलिसांनी 20 ऑगस्टला दिल्ली येथे जाऊन महिलेच्या टोळीतील अन्य तीन जणांना सुद्धा अटक केली आहे. (OMG! 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट)

ANI ट्विट

दरम्यान अशा प्रसंगी नागरिक घाबरून जातात किंवा आपल्या इज्जतीचे कारण देऊन पोलीस तक्रार करण्यास कुरकुर करतात,त्यामुळे या गुन्हयांना प्रोत्साहन मिळते असे पोलिसांनी सांगितले. याशिवाय नागरिकांनी सर्व गोष्टींची तपासणी करून मगच आर्थिक बाबींचे निर्णय घ्यावेत तरीही असा वाईट अनुभव आल्यास सायबर सेल अंतर्गत पोलिसांशी सपंर्क करावा