विजय मल्ल्या याच्या संपत्तीवर येणार जप्ती, मुंबई पीएमएल कोर्टाने सुनावला निर्णय
Vijay Mallya (Photo Credit-PTI)

मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी मुंबई पीएमएल कोर्टाने विजय मल्ल्या याच्या संपत्तीवर जप्ती करण्याचा निर्णय कोर्टाने सुनावला आहे. मात्र संपत्तीचा लिलाव कधी केला जाणावर यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच येत्या 18 जानेवारी पर्यंत कोर्टाने या निर्णयावर स्टे आणला आहे. कारण या निर्णयामुळे पक्षकारांना मुंबई उच्च न्यायालयात अपील करता येऊ शकते. ईडीच्या सुत्रांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांनी लंडन मधील एका न्यायालयत विजय मल्ल्या याच्या संपत्तीवर जप्ती करणे आणि दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली होती. विजय मल्ल्या भारतीय बँकांकडून नऊ हजार करोड रुपयांपेक्षा अधिक पैसे घेऊन ब्रिटेन येथे पळ काढला. बँकांनी 2018 मध्ये ही याचिका 2018 मध्ये दाखल केली होती. माल्ल्या याने बँकेकडून कर्ज हे किंगफिंशर एअरलाइन्ससाठी घेतले होते. माल्ल्याने बँकांचे कर्ज बुडवत 2016 मध्ये भारत सोडून पळ काढला होता.(विजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर, मल्ल्याच्या संपत्तीवर जप्तीचे ED चे मार्ग मोकळे) 

ANI Tweet:

देशात गेल्या काही महिन्यांपासून कर्ज बुडवून पलायन केलेल्या निरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांची बरीच चर्चा चालू आहे. करोडो रुपयांची कर्जे बुडवून ही मंडळी भारतातून पळून गेली. मात्र आता ईडी (ED)ने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार फक्त नीरव, विजयच नाही तर तब्बल 36 कर्जबुडव्या लोकांनी भारतातून पलायन केले आहे.दरम्यान,आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत न्यायालयाने मल्याच्या मालमत्ता जप्तीला परवानगी दिली होती. तसेच, आर्थिक फरारी गुन्हेगार कायद्या अंतर्गत न्यायालयाने मल्याला आर्थिक फरारी गुन्हेगार जाहीर केले होते.