Karachi Sweets| Photo Credits: ANI/ Twitter

मुंबईच्या वांद्रे पश्चिम भागात असलेल्या कराची स्वीट्स शॉपच्या (Karachi Sweets) दुकानामध्ये शिवसेना नेते नितीन नांदगावकर (Shiv Sena leader Nitin Nandgaokar) यांनी जाऊन पर्यायी मराठी नाव ठेवण्याची मागणी केली होती. त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आता या घडामोडींनंतर तात्काळ वांद्रे येथील दुकानामध्ये कराची स्वीट शॉपने आपल्या दुकानावरील नावाची पाटी वृत्तपत्राने झाकली आहे. दरम्यान व्हायरल व्हिडिओ मध्ये कराची ही पाकिस्तानात आहे. सध्या पाकच्या कारवाईंमध्ये भारतीय जवान आपले जीव गमावत आहेत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कुठेच कराची स्वीट्स चेनच्या दुकानावर 'कराची' हे नाव नको अशी मागणी केली आहे.

नितीन नांदगावकर हे आपल्या दबंग स्टाईलने अनेकांना वठणीवर आणण्यासाठी, अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या सोशल मीडीया अकाऊंट्सवरून अशा अनेक घटनांचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. त्यामध्ये आता कराची स्वीट्सचादेखील समावेश झाला आहे. नुकतीच त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कराची स्वीट्स शॉप या जुन्या आणि प्रसिद्ध दुकानाच्या मिठाई दुकानात जाऊन मालकाला समज दिली आहे. मुंबई: माटुंगा रेल्वेस्थानकात तरुणीचे बळजबरी चुंबन घेणाऱ्या तरुणाला नितीन नांदगावकर यांनी दिला चोप; पहा व्हिडिओ.

ANI Tweet

नितीन नांदगावकर यांचा वायरल व्हिडिओ

पूर्वी मनसेत काम करणार्‍या नितीन नांदगावकरांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कराची स्वीटस शॉपला मराठी पर्यायी नाव देण्याची मागणी करणार्‍या नांदगावकर यांच्या या भूमिकेला शिवसेनेचा पाठिंबा आहे की नाही याची अद्याप अधिकृत भूमिका पक्षाने स्पष्ट केलेली नाही.

दरम्यान कराची स्वीट्स शॉपच्या फॅक्टरी हैदराबाद आणि दिल्लीमध्ये आहेत. कराचि स्वीट्सची मिठाई, बिस्किटं प्रसिद्ध आहेत. 2008 साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर  2009 मध्ये मुलूंड मध्ये कराची स्वीट शॉपच्या दुकानाचे नाव बदलण्याची मनसेने मागणी केली होती. त्यानुसार त्यांंनी नावात बदल केला होता.