Zomato-UberEats | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Mumbai: मुंबई महापालिकेकडून बुधवारी लॉकडाऊन संदर्भातील नव्या मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार फूड डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवासुविधा ऑनलाईन पद्धतीची सर्विस दरदिवशी 24 तास सुरु राहिल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याचसोबत डोळ्याचे दवाखाने आणि चष्मांची दुकाने सुद्धा सुरु ठेवता येणार आहे. मात्र त्यांना सकाळी 7 ते संध्याकाळी 8 दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. ड्रायव्हर्स, कूक, डोमॅस्टिक हेल्प आणि वैद्यकिय विभागासंबंधीत कर्मचाऱ्यांना ही सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी दिली गेली आहे.(BKC Covid Vaccination Centre: कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक मुंबईतील बीकेसी कोविड लसीकरण केंद्रात दाखल) 

त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांना प्रवास करण्यास मुभा असणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ हॉल तिकिटासह एका पालकाला सुद्धा प्रवासादरम्यान आपल्यासोबत घेऊन येऊ शकतात. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी असे म्हटले आहे की, ऑनलाईन डिलिव्हरी फूड आणि अत्यावश्यक सेवासुविधांसाठी 24 तास परवानगी असणार आहे.

सर्व प्रकारचे डिलिव्हरी फूड आणि अत्यावश्यक सेवासुविधा ऑनलाईन पद्धतीने जसे झोमॅटो, स्विगी यांना आठवड्यातील दरदिवशी 24 तास सर्विस नागरिकांपर्यंत पोहचवण्यास परवानगी असणार आहे. त्यामुळे आता असे स्पष्ट होते की, विकेंड लॉकडाऊनच्या दिवशी नागरिकांना हॉटेल्समधून फूड टेकअवे सुद्धा करता येणार नाही. परंतु होम डिलिव्हरीसाठी परवानगी असणार असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे.(Coronavirus In Pune: असेच वाढत राहिल्यास पुण्यात कोरोना रुग्णांना बेड्स कमी पडतील- पुणे महापौर मुरलीधर मोहोळ)

रस्त्यालगतचे फूड स्टॉल्स आणि फळं विक्रेत्यांनी ग्राहकांना टेकअवे ची सुविधा पुरवावी असे ही सांगण्यात आले आहे. याआधी सरकारने 5 एप्रिल पासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने संचारबंदी आणि कलम 144 लागू करण्यात आला. गाइडलाइन्सनुसार, जीवनावश्यक नसलेल्या गोष्टींसंदर्भातील सर्व दुकाने येत्या 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत.