Coronavirus In Pune: असेच वाढत राहिल्यास पुण्यात कोरोना रुग्णांना बेड्स कमी पडतील- पुणे महापौर मुरलीधर मोहोळ
Murlidhar Mohol (Photo Credits-ANI)

पुणे (Pune) शहरात जर कोरोना व्हायरस (Coronavirus In Pune) संक्रमित रुग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर येत्या काळात रुग्णालयात बेड्स कमी पडण्याची शक्यता आहे, अशी भीती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी व्यक्त केली आहे. तसेच, कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेले व्हेंटीलेटर्स आणि बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना विनंतीपत्र दिले आहे, असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. ताज्या आकडेवारीनुसार (बुधवार 7 एप्रिल) पुण्यात उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि त्याबाबतचा तपशील खालील प्रमाणे. (हेही वाचा, Covid 19 Vaccine Status in India: कोरोना लसीवरुन केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विरोधाभासात्मक विधाने)

  • उपचार सुरु :46,071
  • नवे रुग्ण: 5,651 (3,05,372)
  • डिस्चार्ज : 4,361 (253,734)
  • चाचण्या: 26,120 (16,19,856)
  • मृत्यू :  41 (5,567)

दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसाठी हॉटेल्सची मदत घ्यावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने लष्कारकडेही रुग्णालय उपलब्ध करुन देण्यासाठी मदत मागितल्याचे वृत्त आहे. दरम्यान, लष्कराचे यावर अद्याप उत्तर आले नाही. आज सायंकाळपर्यंत लष्कराकडून उत्तर येणे आपेक्षित आहे. जर हे उत्तर सकारात्मक आले तर कोरोना रुग्णांना लष्कराचे रुग्णालय उपलब्ध होऊ शकते.