परीक्षांचे निकाल लागल्यानंतर 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आता मुंबईतील महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहत आहेत. परंतु ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील प्रख्यात महाविद्यालाच्या दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये नावच दाखवले जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्याचसोबत महाविद्यालयाने त्यांनी झळकवलेली कट ऑफ पेक्षा अधिक गुण असले तरीही असा प्रकार घडल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे. चौकशीत असे समोर आले की, विद्यार्थ्यांनी फक्त मुंबई युनिव्हर्सिटीचा Pre-Enrolment फॉर्म भरला असून कॉलेजचा फॉर्म भरलाच नाही.(भारताबाहेर शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; आता परदेश शिष्यवृत्तीसाठी 28 ऑगस्टपर्यंत करू शकाल अर्ज, मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती)
यंदाच्या वर्षात पदवी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परंतु शहरातील काही महाविद्यालयांना प्रवेश अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा अर्धवट फॉर्म आणि सध्या चुकांमुळे पैसे भरण्याच्या प्रक्रियेत अडळथा निर्माण होत आहे. महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन भेट दिल्यास त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. पण काही जणांनी फक्त युनिव्हर्सिटीचा Pre-Enrolment फॉर्मच भरला असुन त्यांना ती सेंन्ट्रलाईज प्रोसेस असल्याचे वाटत आहे.
डीजी रुपारेल महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तुषार देसाई यांनी असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी अर्धवट माहिती किंवा फक्त युनिव्हर्सिटीचाच फॉर्म भरल्याने या प्रकारामुळे आम्हाला समस्या उद्भवत आहे. मात्र काही विद्यार्थी अचुक पद्धतीने ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करत असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटले आहे. (SSC-HSC Re Exam 2020 Update: दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता- वर्षा गायकवाड)
दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अद्याप शैक्षणिक वर्ष सुद्धा सुरु झालेले नाही. तसेच काही परीक्षा सुद्धा रद्द करण्यासह पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आणि यूजीसी द्वारा देशभरातील सर्व विद्यापीठांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी अंतिम वर्षात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात. परीक्षा घेत असताना सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांना इतर सर्व सेवा सुविधा मिळतील याची काळजी घ्यावी असेही या निर्देशांमध्ये म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले आहे की, शेवटच्या वर्षाच्या परीक्षा आयोजित करताना विद्यापीठांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही गोष्टी लादू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची मनमानी करु नये असे म्हटले आहे.