Mumbai News: 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मुंबईतील करी रोड येथील घटना
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai News: मुंबईत (Mumbai) एका तरुणाने राहत्या घरातल गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमन गुप्त असं या तरुणाने नाव असून तो मुंबईत कामानिमित्त आला होता. मुंबई करी रोडवरील अपार्टमेंटमध्ये आपल्या दोन मित्रांसोबत राहायचा. आठ महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातून मुंबईत आला. अमन हा खासगी बॅंकेत अकाउंटंट म्हणून नोकरी करत होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.( हेही वाचा- वर्तकनगर भागात 10 वीत शिकणार्‍या मुलावर प्राणघातक हल्ला)

मिळालेल्या माहितीनुसार,  16 जानेवारी रोजी, अमन गुप्ता यांचे रुममेट सकाळी कामावर निघून गेले तेव्हा अमन झोपलेला होता, सायंकाळी 7.30 वाजता ते परत आल्यानंतर त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांच्या मदचीने त्यांनी रुमचा दरवाजा फोडला आणि पाहिलं की, अमन गुप्ता हा पंख्याला लटकलेला अवस्थेत होता. हे पाहून मित्रांनी शोककळा केली.

घटनेची माहिती काळाचौकी पोलिसांना सांगण्यात आले. अमन याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्याचे मृतदेह पालकांकडे देण्यात आले आहे. पोलिसांनी रुममध्ये तपासणी केली असता कोणतेही सुसाईड नोट सापडली नाही आणि अमन यांचा मोबाईल फोन पोलिसांनी तपासणी साठी ताब्यात घेतला आहे. सुसाईटचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.