नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्टी करणाऱ्यांना बसणार मोठा फटका; मुंबई महानगरपालिकेने रेस्टॉरन्ट आणि पबसंदर्भात जारी केले नवे आदेश
New Year And Christmas Party Alcohol Sell (Photo Credits: File Image)

मुंबई महानगरपालिकाने (BMC) नवीन वर्षाच्या निमित्ताने छतावर पार्टी साजरी करण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच मुंबईतील कोणत्याही रेस्टॉरन्ट आणि पबच्या छतावर पार्टी न करण्याचे आदेश दिले आहेत. लोअर परेल परिसरातीलही सर्व रेस्टॉरन्ट आणि पबला रुफटॉफ पार्टीचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. लोअर परेल येथील कमला मिल्स, रघुवंशी मिल्स आणि तोडी मिल्स याठिकाणांवर मुंबई महापालिका नजर ठेवून असणार आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, 29 डिसेंबर 2017 रोजी लोअर परेल येथील कमला मिल्सच्या कंपाऊंडतील मोडो बिस्ट्रो येथे भीषण आग लागली होती. दरम्यान, या आगीमुळे तब्बल 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर, 21 हून अधिक गंभीर अवस्थेत होते. मृतांमध्ये 11 महिला आणि 3 पुरूषांचा समावेश होता. अधिक महिलांचे मृतदेह वॉशरुममध्ये आढळली होती. कमला मिल्स येथेही अनेक रेस्टॉरन्ट आणि पब आहेत. कमला येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना समोर आली होती. हे देखील वाचा-Sunday Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

वरील सर्व घटना नवीन वर्ष साजरा करत असताना घडल्या आहेत. यामुळे या वर्षी कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहेत. परंतु, मुंबई महापालिकेच्या निर्णयावर तरुण वर्ग नाराजी व्यक्त करत असताना दिसत आहे.