Sunday Mega Block: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
Image For Representation (Photo Credits-Facebook)

सुट्टीच्या दिवशी प्रत्येक रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जातो. तर रेल्वेमार्गावरील काही कामानिमित्त हा ब्लॉक घेतला जात असून या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर वेळापत्रक पाहून बाहेर पडावे लागते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल्याच्या काही फेऱ्या रद्द करण्यासोबत गाड्या उशिराने धावणार असल्याची सुचना सुद्धा प्रवाशांसाठी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक राहणार असल्याने डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गाने धावणार आहेत. तसेच विद्याविहार, कांजुर मार्ग आणि नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत. ठाणे स्थानकातून सकाळी 11.24 ते दुपारी 3.26 या दरम्यान मार्गस्थ होणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबणार आहेत. सीएसएमटी येथून सकाली 10.49 ते दुपारी 3.21 या काळात सुटणाऱ्या डाऊन जलद, अर्ध जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप आणि दिवा स्थानकात थांबणार आहेत.(Western Railway च्या 36 स्थानकांचा होणार कायापालट; रेल्वे परिसरात उभारण्यात येणार आधुनिक उद्यानं)

 हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान वडाळा येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.25 वेळेत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी आणि सकाळी 9.56 ते 4.16 या काळात वांद्रे, गोरेगाव येथे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 2.44 वाजता सीएसएमटी, वडाळासाठी तर गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते 4.58 या काळात वडाळा, सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक दरम्यान पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सुरु असणार आहेत.