चुनाभट्टी-बीकेसी उड्डाण पूल बांधून अनेक महिने उलटले तरी, वाहतुकीसाठी खुला करत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार नबाब मलिक यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. सरकारला या पुलाचे उद्घाटन करुन जनतेसाठी खुला करायचा नसेल तर, तो आम्ही खुला करु असा इशाराही त्यांनी दिला आहे. आज रविवारी नवाब मलिक यांनी रविवारी चुनाभट्टी- बीकेसी पुलाकडे गेल्यानंतर जेसीबीवर उभा राहून त्यांनी आंदोलनदेखील केले आहे. नवाब मलिक यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि स्थानिकांनीही या अंदोलनात सहभाग घेतला आहे.
एएनआयचे ट्वीट-
Mumbai:Mumbai Metropolitan Region Development Authority&Police officials stand atop a JCB machine to talk to NCP Mumbai pres Nawab Malik who is standing atop a 2nd JCB machine.He had said he'll open Chunabhatti-BKC flyover today alleging the opening is being intentionally delayed pic.twitter.com/h1HjDeUj59
— ANI (@ANI) October 27, 2019