राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे (Sunil Tatkare) शिवसेनेत (Shiv Sena) जाण्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र शिवसेनेत मी जाणार नसल्याच्या चर्चा तटकरे यांनी फेटाळून लावत राष्ट्रवादी पक्षात राहणार असल्याचे म्हटले होते. परंतु आता सुनील तटकरे यांचा पुतण्या आमदार अवधूत तटकरे (Avdhut Tatkare) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी आणखी एक धक्का लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अवधूत तटकरे हे अलिबाग-रायगड जिल्ह्यामधील आमदार आहेत. मात्र सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यामध्ये काही राजकीय शीतयुद्धा सुरु असल्याचे दिसून आले होते. तसेच शरद पवार यांनी दोन्ही तटकरे यांच्यात समेट घडवून आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु या दोघांमधील शीतयुद्ध काही कालावधीपूरतेच होते. तर अवधूत तटकरे हे सुनीट तटकरे यांचे थोरले बंधु अनिल तटकरे यांचे पुत्र आहेत.(बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी दिला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा;राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेत सामील होण्याचे संकेत)
तर अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु जर अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला अजून एक धक्का बसणार आहे. त्याचसोबत अवधूत यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्यास तटकरे कुटुंबाला भगदाड पडणार असल्याचे बोलले जात आहे.