महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) धर्तीवर अनेक विरोधी पक्षांमधील नेते मंडळी आपल्या पक्षाला रामराम करून शिवसेना (Shivsena)- भाजपा (BJP) च्या वाटेवर चालू लागली आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) येथील आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी आज, 27 ऑगस्ट रोजी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सोपल हे काहीच दिवसात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (सुप्रिया सुळे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकेचा वर्षाव)
आमदार दिलीप सोपल यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची औरंगाबाद येथील निवासस्थानी भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.यावेळी सोपल यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार आंबादास दानवे उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर येत्या दोन दिवसात सोपल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहे.
दरम्यान, याबाबत विरोधी पक्षांकडून आपल्या पक्षातील नेते मंडळींच्या पक्षांतरच्या प्रसंगांवरन भाजप वरच टीका केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा . भाजपचे सरकार केवळ अश्वासन देण्याचे काम करत आहे. आकर्षित भाषण करुन सामान्य जनेतेची दिशाभूल केली जात आहे. पक्ष बदलणाऱ्यांवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी पक्ष बदलणे मोबाइलच्या सीम कार्डसारखे झाले आहे, जो जास्त बोलायला देणार त्याचे सीमकार्ड वापरायचे अशा शब्दात टीका केली आहे.