Mumbai: पोस्टाच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, NCB विभागाकडून मोठी कारवाई
मुंबई पोलीस (Photo Credits: File Photo)

नारकोटिक्स ब्युरो कंट्रोल म्हणजे एनसीबीच्या मुंबई विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील लोणावळा पोस्ट ऑफिसात ड्रग्ज असलेले पार्सल जप्त केले गेले. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहे. एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, रविवारी याबद्दल माहिती देण्यात आली. पार्सल दोन दिवसांपूर्वी कॅनडा येथून पाठवण्यात आले होते. जेव्हा एनसीबीच्या पथकाने ते उघडून पाहिले असता त्यांना 1.03 किलोग्रॅमचे मरिज्युआना मिळाला असून तो जप्त केला. तसेच 74 ग्रॅमच्या या अंमली पदार्थाची जप्ती नवी मुंबईती नेरुळ येथील एका इमारतीमधून हस्तगत करण्यात आले. तपासानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 50-55 लाख रुपये आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, मुंबई आणि अहमदाबाद येथे त्याची विक्री केली जाणार होती.

एनसीबीने या प्रकरणी अहमदाबाद येथील श्रीमय परेश शहा आणि नवी मुंबईतील ओंकार जयप्रकाश तुपे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील धारावीत पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरकडून जवळजवळ 1.20 किलोग्रॅमचे हिरॉइन जप्त केले होते. त्याची किंमत तब्बल 2.40 कोटी रुपये होती. या प्रकरणाचा तपास घाटकोपर मधील ANC सेलला ड्रग्जच्या डिलिव्हरी बद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने धारावीतील 60 फीट येथून पेडलर याला अटक करण्यासाठी कट रचला.(Thane: शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी दोन भावांना अटक; भिवंडी येथील घटना)

संयुक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी असे म्हटले की, संबंधित पेडलर हा अन्य पेडलर्स किंवा ग्राहकांना ड्रग्ज विक्री करण्यासाठी पोहचला. पथकातील सदस्यांनी पॅडलर कडून 1.20 किलोग्रॅम ड्रग्जचे पॅकेटसह रंगेहाथ पकडले. त्यामध्ये हिरॉइन मिळाले असून त्याची किंमत 2.40 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.