
मुंबईतील दादर येथे बुधवारी 59 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात दादर येथे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून आले होते. परंतु जेव्हा पासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी या परिसरात 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दादर येथे कोरोनाबाधित रुग्णांचा वाढीव दर 2 टक्के आहे. तर धारावीत तोच दर 0.41 टक्क्यांवर आहे. एकूणच शहरात कोरोनाच्या रुग्णांचा वाढीव दर पाहिला असता 1.36 टक्के आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)
दादर येथे कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट हा 31 दिवस असा आहे. तर धारावीत डबलिंग रेट 247 दिवस असून शहराचा 52 दिवसांचा आहे. एमसी (जी-नॉर्थ) किरण दिघावकर यांनी असे म्हटले आहे की, दादर येथे कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत असल्याने नागरी अधिकारी याकडे सातत्याने लक्ष देत आहेत. तसेच फिरते फिव्हर क्लिनिक्स जे महापालिकेकडून चालवले जातात ते इमारती आणि चाळींचा बाहेर नेहमीच सेवेसाठी उपलब्ध असतात. दादर येथे एकूण 1277 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(पुणे: येरवडा मध्यवर्ती कारागृह मधील 5 कैदी फरार; शहरात खळबळ)
दादरचा परिसर हा जी-नॉर्थ वॉर्डमध्ये येत असून त्यात माहिम आणि धारावी यांचा सुद्धा समावेश होतो. तर मे महिन्यात धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यावेळी मात्र दादर येथे कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण होते. दादर येथे सर्वाधिक प्रमाणात मध्यमवर्गीय लोक राहत असून नागरिकांकडून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करायचे. पण जेव्हापासून मार्केट, दुकाने आणि ऑफिसे सुरु झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडायला लागले तेव्हापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.