महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार सह सर्व प्रशासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून काल (15 जुलै) 233 मृत्यू आणि 7,975 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,75,640 वर पोहोचली आहे. आज राज्यात 3,606 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तब्बल 1,52,613 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई (Mumbai) शहरात आहेत. मुंबईमधील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 96,253 वर पोहोचली आहे.
सध्या महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) 55.37 टक्के आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.96 टक्के इतका आहे. सध्या राज्यात एकूण 1,11,801 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,390 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 96,253 वर
जिल्हानिहाय कोरोना बाधितांची आकडेवारी येथे पाहा
#राज्यात आज ७९७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील #कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २,७५,६४० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि महानगरपालिका निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.-#coronainmaharashtra #CoronaUpdates @PIBMumbai @MahaDGIPR pic.twitter.com/uXmu6NBkE2
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 15, 2020
तर देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 9,36,181 वर पोहचला आहे. यापैकी, यापैकी 3,19,840 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, 5,92,032 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 24,309 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रिकव्हरी रेट 63.20 टक्क्यांवर पोहचला असून रिकव्हरी आणि मृत्य दराची सरासरी पाहिल्यास 96.05टक्के : 3.95 टक्के अशी असल्याचे सुद्धा आरोग्य विभागाने सांगितले आहे.