प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) शहरामध्ये आज 1,390 कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 96,253 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 62 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्त्यू झाला असून, आतापर्यंत 5464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सकारात्मक गोष्ट म्हणजे आज मुंबईमध्ये 1,197 कोरोना व्हायरस रुग्ण बरे झाले असून, एकूण 67,830 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. आज मुंबईमध्ये 996 कोरोना संशयित रुग्णांची भर्ती झाली असून, सध्या शहरामध्ये 22,959 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत.

आज झालेले सर्व 62 मृत्यू हे गेल्या 48 तासांत झाले आहेत. यातील 51 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 41 रुग्ण पुरुष व 21 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 38 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 21 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 70 टक्के आहे. 8 जुलै ते 14 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.34 टक्के होता. 14 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4, 08, 320 होत्या. (हेही वाचा: धारावीत आज 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 2415 पोहचली

एएनआय ट्वीट -

 

सध्या मुंबईमध्ये आयसीयु बेड्स (ICU Beds) किंवा व्हेंटीलेटर बेड्सची संख्या 1737/1053 आहे व ऑक्सिजन बेड्सची संख्या 11,254 आहे. सध्या मुंबईमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, आतापर्यंत मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून या व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. केंद्राकडून देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर्स विविध कोविडच्या रुग्णालयात पुरवले जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.