प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुण्यामधील येरवडा मध्यवर्ती कारागृहामधून आज (16 जुलै) पाच कैदी फरार झाल्याने एकच खळबळ पसरली आहे. दरम्यान कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये येरवडा कारागृहातील (Yerawada Central Prison) काही कैद्यांना इतरत्र इमारतींमध्ये हलवण्यात आले होते. अशाच एका तात्पुरत्या केंद्रामध्ये 5 जणांनी खिडकीचे गज तोडून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यामध्ये काहींवर 'मोक्का'चा गुन्हा दाखल आहे. तर अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे, सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान जेलमध्ये असताना कैद्यांकडे खिडकीचे गज तोडण्यासाठी आवश्यक आणि धारदार वस्तू कशा आल्या? हा प्रश्न आता उभा  राहिला आहे. दरम्यान जेल प्रशासनाला या घटनेची माहिती कळताच गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून त्यांचा पुणे शहर आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये शोध सुरू झाला आहे.

ANI Tweet

पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता 23 जुलै पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कडकडीत लॉकडाऊन पाळला जात आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 30,500 वर पोहचला आहे.