मुंबईमध्ये मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी6आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे.
बोरिवली पूर्व येथून मुलांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका महिलेने तिच्या6वर्षाच्या मुलाला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने तिच्या मुलाला तेलगू कुंटुंबाला विकून तिला 1 लाख रुपये मिळणार होते. पोलिसांना या टोळीची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. तर टोळीतील राजेश नावाचा व्यक्ती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
या प्रकरणी आरोपी महिलेच्या घरामध्ये 35 हजार रुपयांची रोकड मिळाली आहे. तर नवरा हा दारुच्या आहारी गेला असून घरखर्चासाठी लागणाऱ्या पैशांसाठी तिने हे कृत केल्याचे या आरोपी महिलेने पोलिसांना कबुली दिली आहे.