मुंबई: MM मिठाईवाला यांच्या चालकाला 12 लाख रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

मुंबईतील प्रसिद्ध मिठाई म्हणून एमएम यांच्याकडे पाहिले जाते. मात्र या मिठाईवाला यांच्या चालकावर 12 लाख रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, चालक दुकानातील दिवसभरातील कमाई मालकाकडे नेऊन देत असे. तसेच हा चालक त्यांच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून काम करत असल्याचे ही पोलिसांनी सांगितले आहे.

प्रदीप संनगले असे आरोपी चालकाचे नाव आहे. एमएम मिठाईवाले यांच्या प्रदीप याच्यावर अधिक विश्वास होता. त्यामुळे दुकानातील दिवसभराची कमाई याच्याकडून त्यांना देण्यात येत होती. मात्र चालकाने 2 जानेवारी रोजी त्याच्या काही मित्रांसोबत पैसे चोरी करण्याचा विचार केला. तर 2 जानेवारीला त्याने चालकाना पैसे न देता वाटेतच मित्रांना भेट देत त्यांच्याकडे पैसे दिले. मात्र मालकाला पैसे घेऊन येत असताना चोरी झाल्याचे बनावट कारण सांगितले. यावर मालकांनी चालकाच्या म्हणण्यानुसार पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता चालकाने दोन जणांना फोन केल्याचे दिसून आले. त्या क्रमांकावर पोलिसांनी फोन केला असता त्यांना चालक बोलत असल्याचे भासवून चेकनाका येथे बोलावले. त्याचवेळी चालकाच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.(मुंबई: पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून व्यवसायिकांची फसवणूक; टोळी गजाआड)

तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये स्थित एका डायमंड कंपनीतील महिला अकाउंटंटने ऑफिसमधून 30 लाख रुपयांची चोरी केल्याची बाब समोर आली होती. ही चोरलेली रक्कम घेऊन महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. कंपनीच्या लॉकर मधून एकाएकी इतकी रोकड गायब झाल्यावर कंपनीने तपास केला यामध्ये पूजा दराल  या 25 वर्षीय अकाउंटंटचे नाव पुढे आले. ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यावर अनेकांनी हा प्लॅन फार पूर्वीपासून आखला जात असल्याचे सांगितले होते.