
तांत्रिक विद्येव्दारे पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून व्यवसायिकांची फसवणूक (Fraud Case) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. संबंधित टोळी बनावट नोटांचा वापर करुन व्यवसायिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालत असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष 9 ने ही कारवाई केली आहे. तसेच वांद्रे (bandra) परिसरातील व्यवसायिकांना सावध राहण्याचे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.
वांद्रे येथील लालमट्टी झोपडपट्टीजवळ एका कारमध्ये बसून एक टोळी पैशांचा पाऊन पाडण्याचे व्यवसायिकांना अश्वासन देत असल्याचे माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी फसवणूक करणाऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी मुख्य गुन्हेगार रविराज शेट्टी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेट्टी आणि त्याचे साथीदार व्यवसायिकांना काळ्या जादू दाखवून आत्माला बोलावून तांत्रिक विद्येच्या जोरावर पैशांचा पाऊस पाडत असल्याचे सांगायचे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने दिली. तसेच गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांच्याकडील 50 पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत असे. यामुळे अनेक व्यवसायिकांनी फसवणूक करणाऱ्या टोळीकडे मोठ्या रक्कमेची गुंतवणूक करत असे. त्यानंतर ही टोळी आपला मोबाईल क्रमांक, ठिकाण बदलून नव्या व्यवसायिकांचा शोध घ्यायचे, अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. हे देखील वाचा- ठाणे: राम मंदिरात चोरी; सव्वा लाखाच्या दागिने, रोकड गायब
दरम्यान पोलिसांनी या टोळीला गजाआड केले असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन दिले आहे. ज्यावेळी पोलिसांनी या टोळीला पकडले तेव्हा त्यांच्या वाहनातून अॅम्बसी ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या नावाचे बनावट पत्र, काळ्या कपड्याची बाहुली, 5 नारळ, रंगीत गुंडी, हळद, कुंकू, लिंबू, काळे तीळ, सुया आणि काळे कापड न इत्यादी वस्तू आढळल्या.