ठाणे: राम मंदिरात चोरी; सव्वा लाखाच्या दागिने, रोकड गायब
Arrests | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

मंदिरातील चोरी करण्याचे अनेक घटना घडत आहे. यातच ठाणे (Thane) येथील कोनगावातील राम मंदिरात चोरी झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंदिरातील दागिने आणि रोकड मिळून एकून 1 लाख 25 रुपयांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. ही चोरी रविवारी मध्यरात्री झाली असून सोमवारी सकाळी मंदिरातील पुजारीने स्थानिक पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली. सध्या स्थानिक पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ठाणे येथील कोनगाव परिसरात एक रामाचे मंदिर असून अनेक भाविक त्या ठिकाणी येत असतात. तसेच मंदिरात दानही करत असतात. परंतु, या मंदिरात चोरी झाल्याचे कळताच भाविक संतापले आहेत. मंदिराच्या पुजारीने रविवारी मंदिर बंद करुन गेल्यानंतर दागिने आणि रोकडची चोरी करण्यात आली. कारण सोमवारी सकाळी पुजारीने मंदिरात प्रवेश केला तर, त्याला चोरी झाल्याचे कळाले. त्यानंतर पुजारीने पोलिसांनी याची महिती दिली. मंदिरातील दागिने आणि रोकड मिळून एकून सव्वा लाख रुपये गायब झाले असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेराही पळवला आहे. यामुळे कोनगाव पोलिसांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. हे देखील वाचा-Mumbai Fire: मुंबईतील घाटकोपर परिसरातील बांबू गोदामाला भीषण आग

कोनगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करण्याअगोदर चोरट्यांनी मंदिरातील सर्व माहिती मिळवली त्यानंतर चोरीचा सापळा रचला. तसेच या मंदिरातील पुजारी कधी मंदिरातून बाहेर पडतो, याचीही माहिती त्यांना होती. यानंतरच त्यांनी चोरी करण्याचा डाव रचला आहे.