Mumbai Fire: मुंबईतील घाटकोपर परिसरातील बांबू गोदामाला भीषण आग
Ghatkopar Factory Fire. (Photo Credits: ANI)

Mumbai Fire: मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरातील खैरानी रोड परिसरातील एका बांबू गोदामाला भीषण आग लागली आहे. या परिसरात बांबू व्यावसायिकांची मोठ-मोठी गोदामं आहेत. यातील काही गोदामांना ही आग लागली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. तसेच खैरानी रोड परिसरात वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोदामात अनेकजण अडकल्याची भीती आहे. आगीमुळे या परिसरात धुराचे काळे लोट आकाशात पसरले आहेत. (हेही वाचा - मुंबई: विलेपार्ले परिसरातील 13 मजली इमारतीला भीषण आग)

मुंबई तसेच दिल्ली शहरामध्ये डिसेंबर महिन्यात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मागच्या आठवड्यात मुंबईतील विलेपार्लेमध्ये बजाज रोडवर असलेल्या 'लाभ श्रीवल्ली' या 13 मजली इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पथकाकडून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.  तसेच दिल्ली येथील अनाज मंडी भागात लागलेल्या  आगीत अनेक जणांचा मृत्यू झाला होता.