मुंबईतील विलेपार्लेमध्ये बजाज रोडवर असलेल्या 'लाभ श्रीवल्ली' या 13 मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाकडून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागली आहे. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीच्या 7 व्या आणि 8 मजल्यावर आग लागली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या इमारतीला आग लागली तेव्हा इमारतीत काही जण अडकले होते. मात्र, त्यांची सुटका करण्यात आली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. तेथे ही आग लागली आणि नंतर इतर मजल्यावर पसरल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आजुबाजूंच्या इमारतींमधील वीजपुरवठाही बंद करण्यात आला आहे. मागील आठवड्यात दिल्लीमध्ये कारखान्याला लागलेल्या आगीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. (हेही वाचा - दिल्लीतील मुंडका परिसरातील प्लायवुड कारखान्यात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल)
Maharashtra: Fire breaks out at Labh Shrivalli building in Vile Parle West, Mumbai. Fire confined to 7th & 8th floor of the building. Firefighting & rescue operations underway. More details awaited. pic.twitter.com/7RmkHHjSk0
— ANI (@ANI) December 22, 2019
मागील आठवड्यात नवी दिल्लीतील मुंडका परिसरातील एका प्लायवुड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. तसेच त्याअगोदर दिल्लीतील अनाज मंडीत लागलेल्या आगीत 43 जणांना प्राण गमवावे लागले होते.