दिल्लीतील मुंडका परिसरातील प्लायवुड कारखान्यात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल
Fire at Delhi's Mundka (PC- ANI)

Delhi Fire: नवी दिल्लीतील मुंडका परिसरातील (Mundka Area) शनिवारी एका प्लायवुड कारखान्याला (Plywood Factory) भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी 21 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. शनिवारी पहाटे 5 वाजता अग्निशमन दलाला याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.

गेल्या रविवारी अनाज मंडीत लागलेल्या आगीत 43 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आज पुन्हा एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. अद्याप, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच प्लायवुड कारखान्याला लागल्याल्या आगीमुळे त्याबाजूला असलेल्या बल्ब कारखान्यातही ही आग पसरली, असे तेथील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Delhi Fire: अनाज मंडी आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना केजरीवाल सरकारकडून 10 लाखांची मदत)

सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. 8 डिसेंबर रोजी दिल्लीतील अनाज मंडी परिसरात झालेल्या भीषण अग्नितांडवात 43 जाणांचा बळी गेला होता. पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून याठिकाणाहून 56 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले होते. या आगीत बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना केजरीवाल सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती.