Mumbai: अल्पवयीन मुलीचा रेल्वेत विनयभंग करणाऱ्या सहप्रवाशाला अटक
Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

Mumbai: पुणे येथील एका 26 वर्षीय व्यक्तीला दादर जीआरपी यांच्याकडून अल्पवयीन मुलीचा कोणार्क एक्सप्रेसमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या विरोधात आयपीसी कायद्याअंतर्गत आणि पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आली होती.(Nanded Accident: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात; नववधूसह आठ जणांचा जागीच मृत्यू)

पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जाणारी असून हैदराबाद येथे राहणारी आहे. तिने घरातून पळ काढत मुंबईत आली होती. पीडितेने काही तास शहरात घालवल्यानंतर तिने त्याच दिवशी आपल्या घरी परतण्याचा विचार केला. त्यानंतर तिने दादर येथून कोणार्क येथून दुपारी 2.10 वाजताची ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये चढल्यानंतर अज्ञात व्यक्तीनेचे तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्याने प्रथम तिच्या पायांना स्पर्श केला. त्या व्यक्तीच्या अशा प्रकारामुळे तिने त्याची तक्रार सहप्रवाशांना केली.(Sex Racket: पिंपरी चिंचवडमध्ये व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तीन महिलांची सुटका)

आरोपी व्यक्तीला पुणे येथे ट्रेन पोहचली असता जीआरपी यांच्या ताब्यत दिले गेल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडितेने तक्रार केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर आरोपीला दादर जीआरपी यांच्या ताब्यत दिले गेले.आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो पुण्यात राहणारा आहे. ठाणे येथील नोकरीच्या इंटरव्यूवरुन तो पुण्याला जात होता.