Mumbai metro (Photo Credits: Twitter)

आज सकाळी तांत्रिक कारणामुळे मुंबई मेट्रोची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. त्यामुळे घाटकोपर-वर्सोवा (Versova-Andheri-Ghatkopar Metro-1 corridor) या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्या सकाळी बंद होत्या. त्यामुळे अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, मेट्रो प्रशासनाने काही वेळातचं मेट्रोची दुरुस्ती केली. सध्या घाटकोपर-वर्सोवा दरम्यान वाहतूक सुरळीत असल्याचं मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे. (हेही वाचा - मुंबई: मेट्रो कारशेड बांधणीला स्थगिती नाही; सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण; 15 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी) दरम्यान, मेट्रो विभागाने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. मेट्रो स्टेशनवर झालेली गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त मेट्रो सेवा सुरू करण्यात आली.

मुंबई मेट्रो ट्विट - 

झालेल्या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमची रेल्वे सेवा सुरळीत चालू आहे. धन्यवाद.

मेट्रो प्रवाशांनी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल मेट्रो प्रशासनाने प्रवाशांचे आभार मानले आहेत. अंधेरी विमान मार्गाजवळ मेट्रोमध्ये बिघाड झाला. त्यामुळे याठिकाणी प्रवाशी अडकून पडले होते.

मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखद केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच मेट्रो प्रवासाला लोकांनी पसंती दिली आहे. दिवसभरात लाखो प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. सकाळच्या वेळेस तर मेट्रोमध्ये मुंबईतील लोकलइतकीच गर्दी असते. यावेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कामानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती. परंतु, सध्या ही सेवा सुरळीत सुरू आहे.