Metro Aqua Line 3 | X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, म्हणजेच 05 ऑक्टोबर रोजी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईची बहुप्रतिक्षित पहिली भूमिगत मेट्रो, Aqua Line 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. मुंबईच्या या भूमिगत मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासहि करणार आहेत. या लाईनवर एकूण 10 स्थानके आहेत. हा 12.69 किमी लांबीचा मार्ग खुला झाल्याने आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हा प्रवास सुकर होणार आहे. या मार्गावरून दररोज 4 लाख लोक प्रवास करतील. याशिवाय वाशिम आणि ठाण्यात विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत.

गेल्या गुरुवारीच या मुंबईच्या या भूमिगत मेट्रो मार्गासाठी अंतिम फेरीची मंजुरी मेट्रो रेल्वे सुरक्षा विभागाच्या मुख्य आयुक्तांनी दिली. मुंबईच्या भूमिगत मेट्रोचा प्रवास दाखवणाऱ्या कॉफी टेबल बुकचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे.

वेळा-

उद्या, म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून ही लाईन प्रवाशांसाठी खुली होणार आहे. या मार्गावर पहिली मेट्रो सकाळी 6.30 वाजता आणि शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता धावेल. वीकेंडला पहिली मेट्रो सकाळी 8.30 वाजता सुरू होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळच्या पीक अवर्समध्ये दर 6.40 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. उर्वरित दिवसात मेट्रो 7.30 मिनिटांच्या अंतराने धावेल. दररोज 96 ट्रिप्स चालवल्या जातील. (हेही वाचा: Mumbai Metro Line 3 First Look: मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 ची इथे पहा पहिली झलक; 4 ऑक्टोबर पासून प्रवाशांसाठी होणार सुरू)

स्थानकांची नावे-

सीप्ज

आरे कॉलनी,

एमआयडीसी अंधेरी

मरोळ नका

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2

सहार रोड

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-1

सांताक्रूझ,

विद्यानगर

बीकेसी, बांद्रा

मुंबई मेट्रो लाइन 3- 

तिकीट दर-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील मेट्रो 3 या मार्गिकेवरील आरे ते बीकेसी हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. सीप्झ स्टेशनसाठी 10 रुपये आणि एमआयडीसी अंधेरी व मरोळ नाकासाठी 20 रुपये तिकीट असेल. पुढे आरेपासून सांताक्रूझ आणि वांद्रे या स्थानकांसाठी 40 रुपये तिकीट आकारले जाईल.