भारतामध्ये आजपासून तिसर्या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.
दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर नगारिकांनी कोविन अॅप वर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हांला मेसेज येईपर्यंत थांबा. जर तुम्हांला मेसेज आला तरच लसीकरण केंद्रावर पोहचा. अनावश्यक गर्दी टाळा. जर मेसेज मिळाला नाही तर केंद्रांवर जाणं थांबवा असेही त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच मुंबईमध्ये लसींचा पुरवठा मर्यादित असल्याने 45 वरील नागरिकांच्या दुसर्या डोस साठी प्राधान्य दिले जाणार आहे असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
तरूणाईला आवाहन
तरूणांसाठी आजपासुन लसीकरण सुरू होणार आहे. आज मुंबई मध्ये 1 ते 6 या वेळेत तरूणांचे 5 हॉस्पिटल मध्ये लसीकरण होणार आहे. पण त्यांनी देखील लसीकरणाच्या मेसेजची वाट पहावी. लसीकरण केंद्रं ही लसींचा पुरवठा मिळाल्यानंतरच खुली केली जातील असं त्यांनी स्पष्ट केल्याने वेळे आधी पोहचून गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. COVID-19 Vaccination For 18-44 Age Group in India: भारतात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी CoWin Portal वर आपल्या पहिल्या कोरोना लसीकरणाची नोंदणी कशी करावी?
Priority will be given to people b/w 45 to 60 years of age coming in for their second dose. Vaccines will be given to people b/w 18 to 44 years of age only after they have registered & received a message. Vaccine centres will function as and when we receive vaccines: Mumbai Mayor
— ANI (@ANI) May 1, 2021
मुंबई मध्ये मागील दीड दोन महिने सतत वाढणारा कोविड 19 पॉझिटीव्हीटी रेट देखील आता स्थिरावला आहे. यामध्ये काल पहिल्यांदाच 9.94% या एक अंकीवर त्याची नोंद झाली होती. तर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना डबल मास्क घालण्याचा आणि केवळ गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा देखील सल्ला दिला आहे.