Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा  महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आढावा (Watch Video)
Mumbai Rains | (Photo Credits: ANI)

मुंबईत (Mumbai) आज (15 जुलै) सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरांमधील काही भाग जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील सखल भागांमध्ये म्हणजेच हिंदमाता (Hindmata) आणि किंग्स सर्कल (Kings Circle) येथे पाणी साचले. तसंच अंधेरीतील काही भागांतही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा घेतला आढावा घेतला. यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट दिली. याची माहिती बीएमसीने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Mumbai Rains: जुलै महिन्यासाठी अपेक्षित 100 टक्के पाऊस पहिल्या 14 दिवसातच पूर्ण, पहा आकडेवारी)

दरम्यान पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोळी बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडू नका, साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जावू नका आणि समुद्रकिनाऱ्यांपासून लांब रहा अशा सूचना BMC कडून देण्यात आल्या होत्या.

BMC Tweet:

मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले  होते.  त्यामुळे हिंदमाता परिसरातील वाहतूक पूलाच्या दिशेने वळवण्यात आली होती. तर अंधेरी येथे पाणी साचल्यामुळे उद्भवलेली वाहतूकीची समस्या आता सुटली आहे. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहे. अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Police Tweet:

सांताक्रूझ येथील वेधशाळेने शहरात 14 जुलै पर्यंत 822 मिमी पावसाची नोंद केली आहे. साधारणपणे जुलै च्या महिन्यात 840.7 मिमी पाऊस अपेक्षित असतो. जुलै महिन्याची ही अपेक्षित आकडेवारी येत्या 2-3 दिवसांत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.