BMC (Photo Credits: Twitter)

मुंबईचे सध्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा कार्यकाळ संपत आला आहे. तर येत्या 22 नोव्हेंबरला मुंबईच्या नव्या महापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. तसेच महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. याच परिस्थितीत महापौर पदाच्या निवडणूकीतून भाजपने माघार घेतली आहे. कारण महापौर पदासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर 2022 मध्ये भाजपचा महापौर दिसेल असा दावा सुद्धा आताच करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीनंतर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावर वाद झाल्याने त्यांची युती तुटली. तसेच राज्यात नव्याने सत्ता स्थापन करण्यास राजकीय पक्ष असमर्थ ठरल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. परंतु आता महापौर पदासाठी निवडणूक होणार असल्याने विधानसभेवेळी जे वाद झाल्याचे त्याचे पडसाद यया निवडणूक दिसून येणार का हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.(Mayoral Reservation: मुंबई महापौर पद पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव)

 तसेच महापौर पदासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. यंदाच्या वर्षात महापौर पदासाठी खुल्या वर्षातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे काही नगरसेवक महापौर पदासाठी इच्छुक आहेत.

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर राज्यात सत्ता स्थापन करायची असल्यास काँग्रेस पक्षाला उपमहापौर पद देण्यात यावे अशी अट सुद्धा शिवसेनेसमोर ठेवण्यात आली आहेत. महापौर पदासाठी पार पडणाऱ्या निवडणूकीत 277 नगरसेवक मतदान करणार आहेत.