Mayoral Reservation: मुंबई महापौर पद पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल लागून 20 दिवस उलटले असले तरीही राजकीय पेच कायम असतानाच आज राजकीय पक्षांचे लक्ष मात्र महापौरपदासाठी असलेल्या सोडत निकालाकडे लागून राहिले आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक शहरामध्ये महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आहे. त्यामुळे आता अनेकांच्या पालिका निवडणूकीसाठी तयारीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात अनेक महापालिकांमध्ये महापौर पदाचा काळ अडीच वर्ष होता आणि तो संपला आहे. दरम्यान राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमुळे सरकारने सोडतीला 3 महिन्यांची मुदत वाढ दिली होती. आता ही मुदत 22 नोव्हेंबरला संपणार आहेत.

मुंबई महापौर पद पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी

2017 मध्ये मुंबईत महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याने विश्वानाथ महाडेश्वर यांना महापौर पदावर विराजमान झाले आहेत. त्यांचा कार्यकाळ 8 सप्टेंबर 2019 ला संपला मात्र राज्यातील विधानसभा निवडणूकींमुळे त्यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन महापौर 22 नोव्हेंबर दिवशी निवडले जातील.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगर पालिका आणि त्यांचे महापौरपद कोणासाठी राखीव?

• मुंबई- खुल्या प्रवर्गासाठी राखीव

• पुणे - खुल्या प्रवर्गासाठी राखीव

• नागपूर - खुल्या प्रवर्गासाठी राखीव

• ठाणे- खुल्या प्रवर्गासाठी राखीव

• नाशिक - खुल्या प्रवर्गासाठी राखीव

• नवी मुंबई - खुल्या प्रवर्गासाठी राखीव (महिला)

• पिंपरी चिंचवड - खुल्या प्रवर्गासाठी राखीव (महिला)

• औरंगाबाद- खुल्या प्रवर्गासाठी राखीव (महिला)

• कल्याण डोंबिवली - खुल्या प्रवर्गासाठी राखीव

• वसई विरार- अनुसूचित जमाती साठी राखीव

• मिरा भाईंदर-अनुसुचित जाती साठी राखीव

• चंद्रपूर -  खुल्या प्रवर्गासाठी राखीव (महिला)

• अमरावती- बीसीसी

• पनवेल-  खुल्या प्रवर्गासाठी राखीव (महिला)

• नांदेड-बीसीसी महिला

• अकोला - खुल्या प्रवर्गासाठी राखीव (महिला)

• भिवंडी- खुला महिला

• उल्हासनगर- ओपन

• अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)

• परभणी- अनुसूचित जाती (महिला)

• लातूर - बीसीसी सर्वसाधारण

• सांगली- ओपन

• सोलापूर-बीसीसी महिला

• कोल्हापूर-बीसीसी महिला

• धुळे - बीसीसी सर्वसाधारण

• मालेगाव - बीसीसी महिला

• जळगाव खुला महिला

नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, पनवेल, अकोला, चंद्रपूर, भिवंडी आणि जळगाव महापालिकेचं महापौरपद खुल्याप्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.