मुंबई: चर्चगेट- माटुंगा दरम्यान धावत्या लोकल मध्ये महिलेला डोळा मारणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात, वाचा नेमकं घडलं काय?
molestation (FILE PHOTO)

मागील दिवसात मुंबई लोकल (Mumbai Local)  मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत, पश्चिम रेल्वेने सुरु केलेला सखी व्हाट्सअँप ग्रुप (Sakhee Whatsapp Group)  पासून ते रात्रीच्या वेळी सर्व महिला डब्ब्यात सुक्षेसाठी पोलीस कर्मचारी पुरवण्यापर्यंत अनेक तरतुदी तयार केल्या जात आहेत. पण इतक्या प्रयत्नानंतरही महिलांच्या सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह कायम आहे. याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे, 9  ऑगस्ट रोजी चर्चगेट (Churchgate)  वरून सुटणाऱ्या एक लोकल मध्ये एक महिला प्रवासी आपल्या मुलासोबत प्रवास करत होती, इतक्यात समोर बसलेला एक मनुष्य तिच्याकडे सतत पाहत होता, काही वेळाने या इसमाने तिची छेड काढण्याच्या हेतूने तिला डोळा मारला. हा प्रकार महिलेच्या मुलाने पाहताच त्याने या इसमाला रोखले मात्र त्यानंतरही त्याचा प्रकार थांबेना शेवटी या महिलेच्या मुलामध्ये आणि छेड काढणाऱ्या इसमामध्ये जोरदार मारामारी झाली.

यावेळी इतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना संपर्क करून झाल्याप्रकरची माहिती दिली आणि ट्रेन माटुंगा स्थानकात थांबताच पोलिसांनी या सर्वाना ट्रेनमधून खाली उतरवून संबंधित आरोपीला अटक केली आहे. टाइम्सच्या वृत्तानुसार संबधित आरोपीचे नाव सिद्धेश घाडी असून त्याचे वय 40 वर्ष आहे. (नागपूर: अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्याचे टक्कल करून जाळण्याचा प्रयत्न)

दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाणे ते चर्चगेट प्रवासामध्ये एका महिलेला आलेला असाच अनुभव सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मध्ये महिलांच्या फर्स्ट क्लास च्या डब्ब्यात शिरून एक अगदी अल्पवयीन मुलगा हस्तमैथुन करताना दिसत होता. याबाबत महिलेने ट्विटर वरून मुंबई रेल्वे पोलिसांकडे मदत मागितली, खरतर ट्विट नंतर लगेचच पोलिसांनी या घटनेचा तपास केला होता. पण अशाप्रकारचे प्रसंग घडूच नयेत यासाठी आता काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे.