मुंबई: फोनवर गप्पा मारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या; पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पतीची कबुली
Representational Image (Photo Credits: Facebook)

घाटकोपर (Ghatkopar) येथे, गुरुवारी, 13 फेब्रुवारी रोजी एका इसमाने आपल्या पत्नीची निर्घृण पणे डोक्यात सिलेंडर घालून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येचे कारण अत्यंत शुल्लक होते, आपली पत्नी फोनवर सतत बोलत असते म्ह्णून तिचे बाहेर काहीतरी अनैतिक संबंध आहेत असा या इसमाला संशय होता, याच संशयातून त्याने अखेरीस आपल्या पत्नीला जीवे मारले आहे. अंजना कदम (Anjana Kadam) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे तर तिचा पती प्रदीप कदम (Pradip Kadam) याने तिच्यावर चारित्र्याच्या संशयातून हा जीवघेणा हल्ला केल्याचे समजत आहे. औरंगाबाद: पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह नग्नावस्थेत फेकला

पोलिसांच्या माहितीनुसार, घाटकोपरमधील भटवाडी परिसरात अंजना आणि प्रदीप कदम हे दाम्पत्य राहत होते. काही दिवसानापासून अंजना यांचे फोनवर गप्पा मारण्याचे प्रमाण वाढले होते, उयावरून या दोघांमध्ये भांडण सुद्धा व्हायची मात्र यात तिचे खरोखरच काही विवाहबाह्य संबंध आहेत का? हे सिद्ध झाले नव्हते. तारोही गुरुवारी या दोघांमधील भांडण बरेच पेटले याच रागात प्रदीपने चक्क घरातील भरलेला सिलेंडर उचलून अंजनाच्या डोक्यात घातला. हा आवाज येताच शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत अंजनाला वाचवले मात्र अगोदरच ती गंभीर जखमी झाली होती. तिला तसेच तातडीने जवळील राजावाडी रुग्णलयात दाखल करण्यात आले मात्र उपचार्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा सगळा प्रकार घडताच प्रदीप स्वतःहून घाटकोपर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना त्याने स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. या प्रकरणी प्रदीप विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी प्रदीपला कोर्टात हजर करण्यात आले होते त्यावेळेस त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे.