एका अज्ञात व्यक्तीने बस थांब्याला लटकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. सदर घटना साऊथ मुंबईतील नागपाडा येथे घडल्याचे सांगण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय जवळजवळ 45 वर्ष असून तो रस्त्यावरील भिकारी असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी पोलिसांना या संदर्भातील फोन येत बेलासिस रोडवरील एका बस थांब्याला व्यक्तीने लटकून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.(नागपूर: विहिरीत पडलेला उंदीर काढताना तिघांचा मृत्यू)
पोलिसांनी या घटनेप्रकरणी तातडीने घटनास्थळी धाव घेत व्यक्तीला जेजे रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे गेल्यावर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांकडून याबद्दल अधिक तपास केला जात आहे. याबद्दल माहिती नागपाडा पोलीस स्थानकातील सिनियर इन्स्पेक्टर जयप्रकाश मोहिते यांनी दिली आहे.(सोलापूर: चोराने घरात घुसुन मोबाईल चार्जर च्या वायरने आवळला 9 महिन्याच्या चिमुकल्याचा गळा, आईसमोरच बाळाने सोडला जीव)
दरम्यान, या अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर काही भिकाऱ्यांनी पोलिसांना म्हटले की, मृत व्यक्तीवर यापूर्वी Maharashtra Prevention of Begging Act अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता.
तर काही दिवसांपूर्वीच नागपूर मधील एकाच कुटुंबियातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली होती. ही घटना कोरडी परिसरात मंगळवारी दुपारच्या वेळेस घडल्यानेसंपूर्ण नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका विवाहित जोडप आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश होता. या घटनेची माहिती होताच स्थानिक कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच चौघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. तूर्त स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली होती.