सोलापूर: चोराने घरात घुसुन मोबाईल चार्जर च्या वायरने आवळला 9 महिन्याच्या चिमुकल्याचा गळा, आईसमोरच बाळाने सोडला जीव

सोलापूरच्या बार्शी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत वांगरवाडी या गावात राहणार्‍या तुपे कुटुंंबाच्या घरावर अज्ञात चोरांनी हल्ला केला होता, यातील एका चोराने घरातील मोबाईल चार्जरच्या वायरने तुपे यांच्या अवघ्या 9 महिन्याच्या चिमुकल्याचा गळा आवळुन हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

सोलापूर: चोराने घरात घुसुन मोबाईल चार्जर च्या वायरने आवळला 9 महिन्याच्या चिमुकल्याचा गळा, आईसमोरच बाळाने सोडला जीव
Representational Image (Photo Credits: ANI)

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातुन एक ह्रदय पिळवटुन टाकेल असा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शनिवारी, 22 ऑगस्ट रोजी बार्शी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत वांगरवाडी या गावात राहणार्‍या तुपे कुटुंंबाच्या घरावर अज्ञात चोरांनी हल्ला केला होता, यातील एका चोराने घरातील मोबाईल चार्जरच्या वायरने तुपे यांच्या अवघ्या 9 महिन्याच्या चिमुकल्याचा गळा आवळल्याचे समजत आहे, यावेळी बाळाची आई (आश्विनी तुपे) यासुद्धा घरात होत्या त्यांनी बाळाला वाचवण्यासाठी प्रचंड गयावया करुन ही चोरांनी आईसमोरच निर्दयीपणे बाळाचा खुन करुन घरातुन पळ काढल्याचे समजतेय. यावेळी चोराने आश्विनी यांना सद्धा मारहाण केली आहे. Nagpur: पत्नीसोबतच्या वादात माथेफिरूने केली मेहुणीच्या अवघ्या महिन्याभराच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या

News 18 लोकमत च्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, जेव्हा हल्ला झाला तेव्हा आश्विनी या आपल्या 9 महिन्याच्या बाळासोबत घरी एकट्याच होत्या, त्यांचे पती हे ट्रकचालक असुन कामानिमित्त ते चार दिवसांपासुन परगावी गेले होते. ही संधी साधत चोरांनी डल्ला मारण्याचा प्लॅन आखला आणि त्यानुसार घरात शिरताच बाळाची हत्या करुन त्याने आई आश्विनी तुपे यांंना सुद्धा मारहाण करुन हातपाय बांधुन ठेवले, घरात चोरण्यासारखे काहीच सापडत नसल्याने शेवटी कपाटातील एक 2 ग्रॅम सोन्याची चैन घेउन चोरांंनी पळ काढला.

दरम्यान, बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर अज्ञात आरोपी हा घरासमोरील शेतात पळून गेला अशी माहिती आश्विनी यांनी दिली आहे.या अज्ञात हल्लेखोराच्या विरुद्ध आयपीसी कलम 302, 394, आणि 452 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपीचा शोध घेण्यासाठी चार ते पाच पथकं नेमल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2020 08:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).