Baby | Representational Image | (Photo credits: Unsplash/Representational Image)

आपल्या पत्नीसोबतच्या झालेल्या वादाचा राग मनात ठेवून माहेरी गेलेल्या पत्नीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या माथेफिरूने सासरच्या मंडळींच्या वादात मेहुणीच्या अवघ्या महिन्याच्या चिमुरडीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. गणेश गोविंद बोरकर असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. रुपाली पांडे असे मृत बालिकेचे नवा आहे.

न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी गणेश गोविंद बोरकर (Ganesh Borkar) हा कुही येथील रहिवासी आहे. त्याच्या त्याच्या बायकोशी पटत नसल्या कारणाने त्याची पत्नी बाखरी येथे तिच्या माहेरी निघून गेली. पत्नी आपल्या सोबत नांदायला येत नाही याचा राग मनात ठेवून आरोपी गणेश तिच्या माहेरी गेला. तेव्हा त्याचे त्याच्या पत्नीसोबत आणि सासरच्या मंडळींसोबत कडाक्याचे भांडण झाले.

हा वाद चालू असतानाच गणेश शिवीगाळ करत घरात पळून गेला आणि आपल्यासोबत आणलेल्या कापडातील धारदार शस्त्रांनी तिथे पाळण्यात झोलेल्या रुपालीवर सपासप वार केले. हे वार इतके तीव्र होते की, त्या महिन्याच्या चिमुरडीचे आतडे बाहेर आले. त्याच अवस्थेत त्या चिमुरडीला प्राथमिक रुग्णालयात हलविण्यात आले.

हेही वाचा- मुंबई: फुटपाथवर झोपलेल्या 4 वर्षीय चिमुरडीची बलात्कार करुन हत्या

मात्र चिमुरडीची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला दुस-या हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. मात्र त्या दरम्यान डॉक्टरांनी रुपालीला मृत घोषित केले.

रुपाली ही आरोपी गणेशच्या मेहुणीची मुलगी होती. संबंधित घटनेत गणेशला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.