मुंबई: फुटपाथवर झोपलेल्या 4 वर्षीय चिमुरडीची बलात्कार करुन हत्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबईत एक 4 वर्षीय चिमुरडी तिच्या परिवारासह रस्त्याच्या कडेला झोपली होती. त्यावेळी काही अज्ञात लोकांनी तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्यानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे.

तसेच चिमुरडीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह 100 मीटर दूर लेडी जमशेदजी रोड, माहिम येथे फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी अपहरण आणि हत्या केल्याच्या कायद्यानुसार पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी पीडित मुलीच्या आईला आपली मुलगी आपल्या बाजूला नसल्याचे लक्षाच आले. त्यावेळी तातडीने माहिम पोलिसात धाव घेत ती हरविली असल्याची तक्रार केली. तर पोलिसांनी पीडित मुलीच्या आईला तुमची मुलगी शोधून देतो असे सांगून परत पाठविले. खूप मेहनत घेतल्यानंतर लहान मुलीचा तपास पोलिसांनी करण्यास सुरुवात केली.

तर तपासाअंती असे आढळून आले की, गुरुवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास पोलिसांना कळले की, एका लहान मुलीची नग्नाअवस्थेतील मृतदेह माहिम येथे आढळून आला आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे समोर आले. पीडित मुलीचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात आला.

त्याचसोबत पोलिसांनी आजूबाजूच्या इमारतींमधील सीसीटिव्ही फुटेज पाहिले. मात्र अजून ही आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.