Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागांमध्ये आज (28 जून) हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरामध्ये मध्यम व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ( Mumbai Weather Forecast) आहे. दरम्यान, उर्वरीत महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरपाच्या पावसाछी शक्यता (Maharashtra Weather Forecast) आहे. आज सकाळपर्यंत सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नगर, सातारा, सोलापूर, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, वाशीम आदी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला.

मुंबईबाबत अंदाज वर्तवताना हवामान विभागाने म्हटले आहे की, आज दुपारी 2.57 वाजता मुंबईत समुद्राला भरती येणार आहे. यावेळी समुद्रात साधारण 4.61 मीटरच्या लाटा उसळू शकतात. तर 4.41 ओहोटी येईल. यावेळी समुद्रात 4.52 मीटरच्या लाटा उसळू शकतात. मुंबईत गेल्या 24 तासात सरासरी पावसाची नोंद झाली. त्यानुसार, शहरात 8.23 मिमी पाऊस पडला. तर पश्चिम उपनगरात 15.2 मिमी आणि पूर्व उपनगरात 20.19 मिमी पाऊस पडला.

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यापासून अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस कोसळत आहे. परंतू, दुष्काळी भाग अद्यापही कोरडाच आहे. अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने बळीराजासह सर्वच जण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. काही ठिकाणी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पाऊस नसल्याने शेतीची कामे रखडली आहेत. (हेही वाचा, IMD Monsoon Prediction: मान्सून यंदा पूरेपूर बरसणार! सरासरीच्या 101% पर्जन्यवृष्टीची शक्याता- हवामान विभाग)

मुंबई महापालिका ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात काल (रविवार, 27 जून) अनेक ठिकाणी पाऊस पडला. सकाळी 8 वाजेपर्यंत मंडळनिहाय पावसाची नोंद पाहिल्यास कोकण विभागात पोलादपूर 36 मिलिमीटर, राजापूर 37 मिलिमीटर, कणकवली 45 मिलिमीटर, सावंतवाडी 34 मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात कोपरगाव 23 मिलिमीटर, नेवासा 23 मिलिमीटर, पाथर्डी 31 मिलिमीटर, राहता 27 मिलिमीटर, महाबळेश्‍वर29.6 मिलिमीटर, बार्शी 22 मिलिमीटर, माढा65.4 मिलिमीटर, मंगळवेढा 37 मिलिमीटर, मोहोळ 63.8 मिलिमीटर, सोलापूर 96.1 मिलिमीटर इतका पाऊस पडला. तर, मराठवाड्यात औंढा नागनाथ येथे 45 मिलिमीटर, कळमनुरी 21 मिलिमीटर, मुदखेड 26 मिलिमीटर, उस्मानाबाद 38.5 मिलिमीटर, परांडा येथे 22 मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भात गोंडपिंपरी 41.3 मिलिमीटर, वरोरा 28.2 मिलिमीटर, मौदा 23.1मिलिमीटर, समुद्रपूर 23.3 मिलिमीटर, मंगरूळपीर 23.7 मिलिमीटर इतक्या पासवाची नोंद झाली.