Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा वेळापत्रक
Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

Mumbai Local Train Mega Block Update: सोमवार ते शनिवार या काळात प्रवाशांची गैरसोय टाळता यावी म्हणून विविध तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी मुंबईतील मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) रविवारी (1 सप्टेंबर 2019) घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉक असल्या कारणाने मध्य आणि हार्बर मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. पश्चिम रेल्वे मार्ग वापरत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मात्र निश्वास सोडण्यास हकरत नाही. कारण पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. जाणून घ्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक.

मध्य रेल्वे मार्ग मुंबई

मध्य रेल्वेमार्गावर मुलुंड ते माटुंगा रेल्वे स्टेशनदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ या काळात कल्याण स्टेशनवरुन सुटणाऱ्या लोकल अप धिम्या मार्गावर दिवा ते परळ या स्थानकादरम्यान चालतील. या लोकल सर्व मार्गांवर थांबा घेतली. पुढे त्या परळनंतर अप जलद मर्गावरुन धावतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.०५ ते ३.२२ दरम्यान सुटणाऱ्या लोकल डाऊन जलद आणि अर्ध जलद मार्गावरील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. त्या आपले नियमीत थांबेही घेतील. अप जलद लोकल सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. (हेही वाचा, मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बफरला धडकली लोकल; फलाट क्रमांक तीनवर घडली घटना)

हार्बर रेल्वे मार्ग मुंबई

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० या काळात मेगा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरकडे जाणारी सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत, तर पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे येणारी सर्व लोकलसेवा सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ यावेळेत बंद राहिल. दरम्यान मेगाब्लॉक विचारात घेऊन सीएसएमटी ते वाशी मार्गावर लोकलच्या विशेष फेऱ्या चालवल्या जातील. ठाणे ते वाशी/नेरुळ या ट्रान्स हार्बर मार्गावर वाहतूक सुरू राहिल.