Mumbai Local Train Timetable: मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये करण्यात आले 'हे' महत्त्वाचे बदल, वाचा सविस्तर
Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

गेल्या 7 महिन्यांपासून सामान्य नागरिकांसाठी बंद असलेली मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा (Mumbai Local) लवकरच मुंबईकरांसाठी सुरु होण्याचे संकेत मिळत आहे. तसे झाल्यास दैनंदिन प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांची संख्या देखील वाढेल. अशा स्थितीत नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे फे-या वाढविण्यात आल्या असून त्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबईत 1 नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 610 फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)यांनी याआधीच दिली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबई लोकलचे विशेष वेळापत्रक तयार केले असून यात अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे फे-यात किती वाढ केली हे रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर सांगण्यात आली आहे.

यात मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर जलद लोकलच्या 251 फे-या केल्या आहेत. तर धिम्या मार्गावर 585 फे-या केल्या आहेत. असे एकूण मध्य रेल्वे मार्गावर एकूण 836 फे-या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच हार्बर लाईनवर एकूण 490 फे-या वाढविण्यात आल्या आहेत. तर ट्रान्स हार्बरवर 246 फे-या ठेवण्यात आल्या आहेत. यात अप आणि डाऊन मार्गावर रेल्वे फे-या वाढविण्यात आल्या आहेत. हेदेखील वाचा- Mumbai Local Updated: मुंबईत 1 नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 610 फेऱ्या वाढवल्या जाणार; केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

रेल्वे संबंधीचे हे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांना वगळता इतर प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी आहे. मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो प्रस्ताव अनेक संभाव्य धोके लक्षात घेऊन अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. मात्र लवकरच ही रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.