Mumbai Local (Photo Credit - PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेतून ( Western Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत 1 नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 610 फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)यांनी दिली आहे. याशिवाय, वातानुकूलित आणि लेडीज स्पेशल गाड्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मिळून दिवसाला लोकलच्या 1410 फेऱ्या होतात. मात्र, आता ही संख्या 2020 इतकी केली जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सध्या 706 लोकल फेऱ्या चालवल्या जात आहे. त्यात 314 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या 1 हजार 10 इतकी झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 704 फेऱ्या होत आहेत. त्यात 296 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण संख्या आता 1 हजार होणार आहे. हे देखील वाचा- HDFC Bank लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांना Digital Transactions वर देणार कॅशबॅक; जाणून घ्या, कसा घ्याल या ऑफरचा लाभ?

पीयूष गोयल यांचे ट्विट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांना वगळता इतर प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी आहे. मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो प्रस्ताव अनेक संभाव्य धोके लक्षात घेऊन अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.