मुंबई लोकलच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक; लोकलने प्रवास करणार असाल तर पहा हे शेड्युल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आणि लाईफलाईन असलेल्या लोकलचे, आज तीनही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे जर का तुम्ही आज घराबाहेर पडणार असाल तर हे मेगाब्लॉकचे शेड्युल पहा आणि मगच लोकलने प्रवास करण्याचे नियोजन करा. हा मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर सकाळी 9.25 ते दुपारी 2.54 पर्यंत, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरीपर्यंत सकाळी 10.35 ते दुपारी 2.35 आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीपर्यंत सकाळी 10.35 ते दुपारी 4.30 पर्यंत असणार आहे.

सेन्ट्रल रेल्वे -

सेन्ट्रलच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद लोकल सुमारे 20 मिनिटे उशीराने धावतील.

कल्याणहून सुटणाऱ्या लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांतही थांबतील. या मार्गावरील लोकल साधारण 15 मिनिटे उशीरा धावतील.

हार्बर रेल्वे -

हार्बरवर पनवेल ते वाशी मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे.

ट्रान्सहार्बर रेल्वे

ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे मार्गावर सकाळी 10.12 ते दुपारी 4.26 आणि ठाणे ते पनवेल मार्गावर सकाळी 11.14 आणि दुपारी 4 पर्यंत सेवा खंडित करण्यात येणार आहे. पनवेल ते अंधेरी मार्गावरील लोकलही बंद राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवलीमध्ये सकाळी 10.30 ते दुपारी 2.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत जलद मार्गांवरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.