जर या रविवारी आपण मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यासोबतच हार्बर लाइनवरही मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही विलंबाने धावणार आहेत. (हेही वाचा - Bandra-Worli Sea Link: भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाने वांद्रे-वरळी सी-लिंकवर आपली लॅम्बोर्गिनी रेलिंगमध्ये घुसवली, गुन्हा दाखल)
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान, या CST येथून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार. तसेच ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान CST येथून पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.