
मुंबई मध्य रेल्वेची (Mumbai Central Railway) पहिली एसी लोकल (AC Local) ट्रान्स हार्बरवरील (Trans Harbour) ठाणे (Thane) ते पनवेल (Panvel) मार्गावर धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या मार्गावर या गाडीची चाचणी घेण्याचे काम जोरात सुरु आहे. मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल नक्की कोणत्या मार्गावर धावणार असा प्रश्न अनेक प्रवशांना पडला होता. महत्वाचे म्हणजे, ठाणे ते पनवेल दरम्यान सध्याची लोकची एक फेरी कमी करुन त्या जागी एसी लोकल धावणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवशांकडून अधिक भाडे आकरले जाऊ शकते, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल नक्की कोणत्या मार्गावर धावणार असा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून विचारला जात होता. अखेर याचे उत्तर मिळाले असून काही दिवसांतच ठाणे ते पनवले मार्गावर एसी लोकल धावताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावर एसी लोकलच्या एकूण 16 फेऱ्या असतील. त्यापैकी 6 फेऱ्या या गर्दीच्या वेळी असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सांगितले. मध्य रेल्वेला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच एसी लोकल मिळाली आहे. त्यानंतर 3 आठवडे त्याची चाचणी करण्यात सरु आहे. या लोकलच्या डब्यांची उंची, त्यातील वातानुकूलन यंत्रणा आणि बसण्याची व्यवस्था या सगळ्यांचा विचार चाचणीमध्ये करण्यात आला आहे. हे देखील वाचा-मुंबई लोकल मध्ये वाजणार अक्षय कुमार चे 'ओ बाला' गाणे? सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मध्य रेल्वेचा सामाजिक उपक्रम
मध्य रेल्वेला मार्च महिन्यात आणखी सहा एसी लोकल मिळणार असून लवकरच ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल धावेल. सध्या चाचणी आणि पूर्वतयारी करण्याचे काम सुरू आहे. ही सेवा नक्की कधीपासून सुरू होणार याची तारीख अद्याप ठरलेली नाही. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती संजीव मित्तल यांनी दिली आहे.