मुंबई लोकल मध्ये वाजणार अक्षय कुमार चे 'ओ बाला' गाणे? सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मध्य रेल्वेचा सामाजिक उपक्रम
Central Railway (Photo Credits: PTI/Youtube)

चित्रपटांतील अनेक लोकप्रिय गाण्यांचा, डायलॉगचा वापर हा सामाजिक हेतूसाठी केला जातो. या आधीही अशा काही डायलॉगचा वापर करण्यात आला होता. 'भाई मेरे पास माँ है, तुम्हारे पास क्या हैं? मेरे मुँह में पान हैं… भाई थूंकना नही रेल परिसर में.. नही तो 500 रुपया जुर्माना भरना पडेंगा’, अशा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचे फलक वापरून प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने यापूर्वी केला होता. त्याच धर्तीवर मध्य रेल्वे सुरक्षेचे नियम प्रवाशांनी पाळण्यासाठी सध्या अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 या चित्रपटातील ‘ओ बाला, ओ बाला’ (Oh Bala) या धुमाकूळ घालत असणाऱ्या गाण्याचा वापर करण्याच्या विचारात आहे.

सध्या लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडून 'ओ बाला' हे गाणे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे या गाण्याचाच वापर करुन मुंबईतील सामाजिक कामांना हातभार लावावा असा मध्य रेल्वेचा विचार आहे. आता पुन्हा रेल्वे सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध स्लोगन लोकलच्या डब्यातच लावण्याचा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा- खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार

ज्यामध्ये काही अधिकार्‍यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणार्‍या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाचे गाणे ‘ओ बाला ओ बाला’ या गाण्यावर संबंधित कल्पना दिल्या आहे. मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नाही. लोकलच्या डब्यात अक्षय कुमारचे ‘ओ बाला ओ बाला’ हे पाच सेकंद गाणे वाजण्याची शक्यता आहे.

रेल्वेमध्ये अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. यात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांना सामाजिकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने त्यांच्या कलेने मध्ये रेल्वे विचार करत आहेत. तरुणांना हे ज्ञान याआधी अनेक जाहिरातींमधून, गाण्यांमधूनही देण्यात आले आहे. आता त्यात एक पाऊल पुढे टाकत 'ओ बाला' या गाण्याच्या माध्यमातून असाच सामाजिक प्रसार करणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.