मुंबई मध्य रेल्वे मार्गावर रुळ दुरुस्ती मशीन घसरल्याने झालेल्या अपघातामुळे विस्कळीत झालेली अंबरनाथ बदलापूर सेवा पूर्ववत झाली आहे. बुधवारी (27 जानेवारी) सकाळी 9.40 मनिटांनी ही सेवा पूर्ववत झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या CPRO विभागाने दिली आहे. मंगळवारी (26 जानेवारी) मध्यरात्री 2.05 ते 5.10 या दरम्यान रुळ दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघात घडला होता. या अपघातात एक मजूर ठार तर तिन जखमी झाले होते. त्यानंतर प्रदीर्घ काळासाठी या दोन स्थानकादरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.
दरम्यान, घसरलेले मशीन रुळावर घेऊन बाजूला करण्यास काही अवधी लागणार आहे. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले होते. अडथळे दूर झाल्यानंतर आता रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळापासून स्थगित करण्यात आलेली रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु आहे. रेल्वे सुरु झाली असली तरीदेखील ती अद्यापही सर्वसामान्य लोकांसाठी खुली नाही. केवळ महिला आणि अत्यावश्यक सेवेतील खासगी आणि सरकारी कर्मचारी तसेच राज्य सरकारची परवानगी घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेप्रवासाची मुभा आहे. त्यामुळे रेल्वे कधी पूर्वपदावर येणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Central Railway Ambernath Karjat: मध्य रेल्वे मार्गावर 1 ठार, तीन जखमी, वाहतूक विस्कळीत; रूळ दुरुस्त करणारी मशिन घसरल्याने अपघात)
Train services restored on Ambernath-Badlapur section from 9.40 am: CPRO, Central Railway https://t.co/l1MDApsM6p
— ANI (@ANI) January 27, 2021
दरम्यान, येत्या 29 जानेवारीपासून मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेने सुरु केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगरिय रेल्वेसाठी एक आढावा बैठक पार पडली. त्यानंतर रेल्वेने नागरिकांसाठी चांगले संकेत दिले आहेत.