Mega Block | (File Image)

अंधेरीच्या (Andheri)  गोखले पूलावर (Gokhle Bridge) पोलादी गर्डर उभारण्याच्या कामासाठी पश्चिम रेल्वेमार्गावर (Western Rail Line) शनिवार 11 मार्च ते रविवार 12 मार्च दरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये काही बदल करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार लोकलच्या वेळापत्रकात शनिवार 11 च्या रात्री 9.30 ते रविवार पहाटे 5.30 पर्यंत बदल करून काम पूर्ण केले जाईल. यादरम्यान काही लोकल रद्द झाल्या आहेत तर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

गोखले पुलावर गर्डर उभारण्यासाठी अंधेरी स्टेशनवर 5 व्या मार्गिकेवर फलाट क्रमांक 9 वर ब्लॉकच्या काळात वाहतूक विस्कळीत असेल. अंधेरी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या, जलद मार्गावर शनिवार 12.10 ते पहाटे 4.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे. शनिवारी रात्री 12.10 ते पहाटे 4.40 पर्यंत अप जलद मार्गिकेवरील लोकल गोरेगाव पर्यंत धावणार आहेत. या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून जादा लोकल सोडल्या जातील. त्याद्वारा गोरेगाव ते चर्चगेट या मार्गावर हार्बर किंवा धीम्या मार्गावरून प्रवासाची सोय केली जाईल.

पश्चिम रेल्वे मार्गावरील बदल

  • विरार ते चर्चगेट शेवटची फास्ट लोकल विरार वरून रात्री ११.१५ वाजता सुटेल आणि चर्चगेटला रात्री १२.४२ वाजता पोहचेल.
  • वसई रोडवरून अंधेरीकडे जाणारी शेवटची अप स्लो लोकल वसई रोडवरून रात्री ११.१५ वाजता सुटून अंधेरीला रात्री १२.०४ वाजता पोहचेल.
  • बोरिवली ते चर्चगेट ही शेवटची अप स्लो लोकल बोरिवलीहून रात्री ११.३४ वाजता सुटेल आणि चर्चगेटला रात्री १२.३९ वाजता पोहचेल.

पहा ट्वीट

लांब पल्ल्याच्या कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?

10 मार्च दिवशी बरौनी-वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत धावणार.

11 मार्च दिवशी ओखा – मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल बोरिवली येथे 30 मिनिटं थांबणार

भुज – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस बोरिवली मध्ये 15 मिनिटं थांबणार

अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस लोकशक्ती एक्स्प्रेस, वेरावल – वांद्रे टर्मिनस सौराष्ट्र जनता आणि एकता नगर – दादर सुपरफास्ट एक्स्प्रेस अंधेरी स्थानकातून सुटणार

दरम्यान गोखले पूल वाहतूकीसाठी सुरक्षित नसल्याने हा सध्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.