Mumbai Local Mega Block Updates: मध्य रेल्वे कडून 27 मार्चला ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान 12 तासांचा मेगाब्लॉक
Image For Representation (Photo Credits-Facebook)

मध्य रेल्वे (Central Railway) कडून रविवार (27 मार्च) दिवशी दिवा स्थानकामध्ये (Diva Station) विविध तांत्रिक कामं करण्यासाठी 12 तासांचा मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वे या रविवारी ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान (Thane-Kalyan Station) अप आणि डाऊन फास्ट अशा दोन्ही मार्गिकांवर सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे.

मेगा ब्लॉकच्या दिवशी सीएसएमटी स्थानकातून सुटणार्‍या फास्ट लोकल सकाळी 7.55 ते रात्री 7.50 या वेळेत मुलुंड आणि ठाणे, कल्याण स्टेशन मध्ये डाऊन स्लो ट्रॅक वर चालवल्या जाणार आहेत. तर कल्याण मधून सुटणार्‍या अप फास्ट लोकल सकाळी 8.36 ते रात्री 7.50 या वेळेमध्ये कल्याण ते मुलुंड स्थानकादरम्यान अप स्लो ट्रॅकवर वळवल्या जाणार आहे. त्यामुळे काही लोकल 10-15 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता आहे. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे कडून हार्बर मार्गावर ठाणे- वाशी अप-डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर 26 मार्च दिवशी रात्री 11.45 ते 27 मार्चच्या पहाटे 5.45 अर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी, नेरूळ, पनवेल, दरम्यान अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. हे देखील नक्की वाचा:  Mumbai Local Accident: गोरेगाव, मालाड स्थानकादरम्यान ट्रेनमधील गर्दीमुळे 22 वर्षीय तरूणाचा लोकल मधून तोल जाऊन पडल्याने मृत्यू .

पश्चिम रेल्वेवर यंदा रविवार 27 मार्च दिवशी मेगाब्लॉक नसेल. पण 26 मार्चच्या रात्री 11.45 ते 4.45 पर्यंत बोरिवली ते अंधेरी दरम्यान दोन्ही जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.